This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही*

*महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही*
D Media 24

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त पोलीस महासंचालक एच.हितेंद्र यांनी दिला.

बेळगावात नऊ डिसेंबर पासून होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांची एच.हितेंद्र यांनी सुवर्ण सौध येथे बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महामेळाव्याला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.मागच्या वर्षी देखील महामेळावा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र हद्दीत महामेळावा घेतला होता असेही एच.हितेंद्र यांनी सांगितले.

कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध दर्शवणार आहे.महामेळावा घेण्यास परवानगी द्यावी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.