उज्वलनगरमध्ये चोरी
दागिने, रोख रक्कम लंपास
बेळगाव:
शहरांमधील उज्वल नगर येथील दोन बंद घरांची कुलूप तोडून चोरट्याने सोन्या , चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे पाच लाख 98 हजारांची चोरी झाल्याची फिर्याद पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.https://dmedia24.com/there-is-no-alternative-without-the-educational-revolution-prof-madhukar-patil/
मोबीन येरगट्टी यांनी या चोरीची तक्रार पोलीस स्थानकात केली आहे. यामध्ये तीन लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर आठ हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. त्याचबरोबर पंधरा हजार रुपयांची दोन घड्याळे, एक लाख 85 हजार रुपयांची रोकड चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.