बेळगाव:
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. दुसरे रेल्वे गेट पासून ते अरुण थिएटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हॉर्नचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळाला. या मार्गावर वनवे असून देखील वारंवार या ठिकाणी ट्राफिक जामची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे यावर योग्य पर्याय शोधण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बेळगावकडून खानापूरच्या दिशेने जाणारी वाहने ट्राफिक जाममुळे रस्त्यावर दीर्घकाळपर्यंत थांबून राहिली. यावेळी या रस्त्यावर रिक्षा, दुचाकी, बसेस, मिनी बसेस, अवजड वाहने यासह अन्य वाहनांची मोठी रांग लागली होती. या दाटीवाटीमधून प्रत्येक वाहनचालक आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे यावेळी कर्णकर्कश हॉर्नचा आवाज येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना ऐकावा लागला,
दुसरे रेल्वे गेट बंद असताना येथे वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होताना दिसते. त्यामुळे येथे लहान मोठे अपघात वारंवार घडत असतात. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगाव शहर आणि परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा वाढत्या वाहतुक समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागू नये , याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी देखील मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. तेव्हा अशी समस्या पुन्हा निर्माण होऊ नये याची दखल संबंधित घेतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.