सबरजिस्टर कार्यालयावर लोकायुक्तानी छापा
चिकोडी सबरजिस्टर कार्यालयावर लोकायुक्तानी छापा टाकून 30 हजार लाच घेताना चिकोडी सबरजिस्ट्रार यांना ताब्यात घेतले आहे.
बेळगाव लोकायुक्त एस पी यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त पथकाने चिकोडी सबरजिस्ट्रार कार्यालयावर अचानक छापा टाकला.यावेळी जमीन खाते बदल करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेत असताना चिकोडी सबरजिस्ट्रार शिवराजू हे रंगेहाथ सापडले. राजू नावाच्या व्यक्तीकडून आलेल्या तक्रारीवरून ही धाड घालण्यात आली .
तसेच सबरजिस्ट्रार शिवराजु यांच्या घरावर देखील लोकायुक्त पथकाने धाड घालून झडती घेतली.
रात्री उशिरा कार्यालय व घर या दोन्ही ठिकाणी कागदपत्रांची पाहणी व झडती घेण्यात आली.
या घटनेमुळे नेहमी गजबजणाऱ्या मिनि विधान सौध परिसरात एकच खळबळ उडाली.