बेळगाव शहरात कर्जाच्या मानसिक तणावाला कंटाळून एका ऑटोचालकाने आपले जीवन संपवण्याचा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे.
किल्ला तलावात उडी मारून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या ऑटोचालकाची ओळख किरण एन. मणगुत्तकर (वय ४५, रा. कंग्राळी गल्ली) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कर्जाच्या बोजामुळे ते दीर्घकाळ त्रस्त होते.
घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मार्केट पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.