बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले.दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे काही मिनिटातच अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. गटारी ची साफसफाई केलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर दोन फूट पाणी साठले होते.स्मार्ट सिटी योजनेची कामे काही ठिकाणी पूर्ण झालेली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले.शाहूनगर भागात तर अनेक घरात पाणी शिरले.
घरात पाणी शिरल्याने घरातील गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.शाहूनगर भागात रस्त्यावर दोन फूट पाणी साठले होते.लोकांना घरी जाण्यासाठी रस्त्यावरील पाण्यातून जाण्याची कसरत करावी लागली.शनिवारी बेळगावचा आठवडी बाजार भरला होता पण पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या लोकांची आणि भाजीपाला विक्रेत्यांची आसरा शोधेपर्यंत तारांबळ उडाली.