सरस्वती वाचनालयातर्फे व्याख्यानमाला
बेळगाव:
श्री सरस्वती वाचनालय शहापूर बेळगाव आयोजित राज्य मराठी विकास संस्था अनुदान योजनेअंतर्गत वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कै. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे यावर्षी 12 वे वर्ष आहे. शनिवार दिनांक 11 आणि रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक गिरीश पतके यांची व्याख्याने होणार आहेत. दि.11 रोजी मराठी भाषा – विकासाच्या दिशा या विषयावर तर रविवार दि. 12 रोजी 1990 नंतरची मराठी नाटके या विषयावर व्याख्याने होणार आहेत. ही व्याख्याने सायंकाळी 5:30 वाजता होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एस .एस .कॉलेज बेळगावचे निवृत्त प्रा. दत्ता नाडगौडा उपस्थित राहणार आहेत.
श्री सरस्वती वाचनालय, श्रीमती माई ठाकूर सभागृह, कोरे गल्ली शहापूर बेळगाव येथे व्याख्याने होणार आहेत. नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा , असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.