महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना परवानगी दिली जाणार नाही
महारष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही.बेळगावातील जे लोक महामेळावा व्याला येतील त्यांना आम्ही अडवणार नाही.खासदार धैर्यशील माने यांना बेळगावला येण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.महाराष्ट्रातून येणाऱ्या कोणालाही बेळगावातील महामेळाव्याला येण्यास अनुमती दिली जाणार नाही असे कर्नाटकचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी आलोक कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.सी सी टी वही बसवण्याची सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली.महामेळाव्यासाठी एक एस पी सह पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.