नव्या डिजिटल ग्रंथालयाचा शुभारंभ
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते कुदळ मारून आंबेडकर उद्यान यात उभारण्यात येणाऱ्या नव्या डिजिटल ग्रंथालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता सोईस्कर व्हावे याकरिता येथील उद्यानात आय ए एस के ए एस अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने या विकास कामाचा शुभारंभ आज आमदारांसह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या डिजिटल ग्रंथालयाच्या विकास कामांकरिता 1 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले असून जून महिन्यात अखेरपर्यंत या ठिकाणचे काम पूर्ण होणार आहे. जून महिन्यात शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसून अभ्यास करता यावे हा हेतू ठेवून तीन महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी कंत्राटदाराला दिल्या आहेत.
यावेळी या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे समितीचे उपाध्यक्ष मल्लेश चौगुले, दलित नेते सिद्धाप्पा कांबळे ,अर्जुन देमट्टी, महादेव तळवार ,दुर्गेश मैत्री, जीवन कुरणे ,नगरसेवक संदीप जिरगाळ, नगरसेविकास सविता कांबळे, नगरसेविका चिखलदिन ,सुधीर चौगुले, रमेश वडर ,विनोद सोलापूर ,यल्लापा कोलकर यांच्यासह शहरातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.