लक्ष्मी नगर, गणेशपूर येथे अपार्टमेंटमध्ये महिलेची मंगळसूत्र चोरून हत्या – खळबळजनक घटना
लक्ष्मी नगर, गणेशपूर येथील एका अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची भीषण घटना घडली आहे. हत्या झालेल्या महिलेची ओळख अंजना अजित दड्डीकर (वय 49) अशी आहे. अंजना आणि तिचे पती अजित दड्डीकर या अपार्टमेंटमध्ये एकटेच राहत होते. अजित हे ऑटो चालक म्हणून काम करतात.https://dmedia24.com/the-dog-thought-why-but-this-is-a-robot/
अंजनाच्या हत्येचा प्रकार काल संध्याकाळी अजित घरी परतल्यावर उघडकीस आला. तेव्हा अंजना बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. तिला ताबडतोब बेळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाले असल्याचे सांगितले. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, हत्याराने अंजनाचे मंगळसूत्र, कानातील सोने व अंगठी चोरली नंतर तिचा गळा दाबून हत्या केली.
घटनास्थळावर फॉरेन्सिक तज्ञांनी तपासणी केली आहे. या प्रकरणात कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास चालू आहे.