*कु, श्रावणी महेश भीवसे हिने केली परत एकदा *निपाणी तालुक्याची अभिमानाची ताठ मान*
29 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे विविध प्रकारच्या खेळातील खेळाडूंना मेजर ध्यानचंद केंद्रीय परिषद राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन यांच्या कडून उत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा पुरस्कारामध्ये निपाणी भागातून श्रावणी भिवसे या विद्यार्थिनीची निवड झाली होती.आज कालच्या शालेय जीवनामध्ये मुले ,मुली, मोबाईल, कम्प्युटर, टी व्ही, व सतत अभ्यास यामध्ये मग्न झालेले आहेत.
तर श्रावणी अभ्यासाबरोबरच स्वतःचा छंद जोपासत दररोज नित्य नियमाने योग ध्यान व्यायाम करत स्केटिंग चा सराव नित्य नियमाने करत आहे.
श्रावणी ही निपाणी रोलर स्केटिंग अकॅडमीची स्केटर म्हणून यापूर्वी तिने अनेक स्केटिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केलेले आहे श्रावणी चा उत्साह व स्केटिंगची आवड पाहून व तिचे कौशल्य पाहून निपाणी व निपाणी तालुक्यामध्ये अनेक सामाजिक संस्था यांनी यापूर्वीही सत्कार करून प्रोत्साहन दिलेले आहे.
*29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उद्योजक किरण सामंत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, बिपिन बंदरकर, महेंद्र चंडाळे, सूर्यकांत घाडगे, यांच्या मान्यवर उपस्थितीत श्रावणी भिवसे , हिला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*.
स्केटिंग चे प्रशिक्षक श्री अजित शिलेदार, प्रमिला शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले.श्रावणी भिवसे ही निपाणी तालुक्यातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ठरली याबद्दल निपाणी व निपाणी परिसरातून शाब्बासकीचे कौतुक होत आहे. श्रावणीला तिचे पालक महेश भिवसे. , आई श्रीदेवी भिवसे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.