बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार तर कार्यवाहपदी महेश काशिद
बेळगाव : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद तर सहकार्यवाहपदी परशराम पालकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि. १७) कुलकर्णी गल्ली येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. मावळते अध्यक्ष विलास अध्यापक अध्यक्षस्थानी होते.
मावळते कार्यवाह शेखर पाटील यांनी स्वागत करून मागील बैठकीचे इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले.
उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नवीन कार्यकारिणीबाबत चर्चा करण्यात आली. सदस्य जितेंद्र शिंदे यांनी अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद, सहकार्यवाहपदी परशराम पालकर आणि परिषद प्रतिनिधीपदी शेखर पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्याला सदस्य शिवराज पाटील यांनी अनुमोदन दिले. चर्चेअंती सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
विलास अध्यापक आणि शेखर पाटील यांनी आपल्या कालावधीत सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. संघाच्या कामकाजाबाबत नूतन अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेखर पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र पोवार, सदानंद सामंत, मनोज कालकुंद्रीकर उपस्थित होते.