*सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सहकार चळवळ महत्त्वाची : केपीसीसीचे सदस्य मालगौडा पाटील*
*भारताच्या स्वातंत्र्यानंतर सहकारी संस्थांचा झाला विकास झपाट्याने : केपीसीसी चे सदस्य मालगौडा पाटील*
*केदनूर येथे धर्मवीर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन; अनेक मान्यवरांची उपस्थिती*
बेळगाव तारीख 22 डिसेंबर 2024 : भारतातील सहकारी चळवळ कृषी क्षेत्र बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते भारतातील सहकारी संस्थांचा इतिहास शंभर वर्षापेक्षा जुना आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सहकारी संस्थांचा विकास झपाट्याने झाला एका अंदाजा नुसार देशात अर्धा दशलक्षाहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत अनेक सहकारी संस्था विशेषतः ग्रामीण भागात राजकीय सहभाग वाढवतात आणि महत्त्वकांक्षा राजकारणाकडून त्यांचा एक पायरी दगड म्हणून वापर केला जातो तसेच समाजाच्या उन्नतीसाठी सहकार चळवळ ही महत्त्वाची भूमिका बजावून समाजाला आर्थिक स्तर उंचावण्याचा नेहमीच प्रयत्न करते. सुरुवातीच्या काळात भारतात सहकारी चळवळ हळूहळू उभी राहिली 1904 मध्ये मद्रास प्रांतातील ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक निकोल्स ने यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे ब्रिटिश सरकारने सहकार्य नियम तयार केला कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील कानगिनहाळ येथे स्थापना झालेली पहिली सहकार संस्था आशियातील पहिली सहकारी संस्था ठरली याची सुरुवात सिद्धानगौडा पाटील रामनगवडा पाटील यांनी केली होती. केंद्रीय सहकार मंत्रालय हे भारत सरकारच्या अंतर्गत असलेले एक मंत्रालय आहे जे जुलै 2021 मध्ये स्थापन करण्यात आले होते हे मंत्रालय देशातील सहकारी चळवळी मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट प्रदान करते 06 जुलै 2021 रोजी मंत्रालयाच्या निर्मितीची घोषणा सहकार असे समृद्धी सहकारातून समृद्धीच्या विजन स्टेटमेंट सह करण्यात आले या मंत्रालयाच्या निर्मितीपासून निर्मितीपूर्वी या मंत्रालयाचे उद्दिष्टे कृषी मंत्रालयाने पाहिली होती . अशाच विविध पद्धतीने समाजाच्या सर्वसामान्यांच्या समस्या आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सहकार चळवळ आज समाजात वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करून सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे. धर्मवीर को-ऑपरेटिव्ह सोसायटी चांगली प्रगती करू व उन्नती करू. *असे प्रतिपादन समाजसेवक, केपीसीसी चे सदस्य तसेच पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे जवळचे आक्त सहाय्यक श्री मलगौडा पाटील यांनी केले.*
केदनुर ता. बेळगांव येथील कडोली जिल्हा पंचायत भागात येणाऱ्या केंद्र गावांमध्ये धर्मवीर ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या उद्घाटन प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी व युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कडोली भागाचे अप्त सहाय्यक मलगौडा पाटील हे या कार्यक्रमात सहभागी झाले.
प्रथमता दीप प्रज्वलन तसेच हिंदूंच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला चालना देण्यात आले. तसेच मलगौडा पाटील यांच्या हस्ते फीत कापून या सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले.