संपूर्ण देशात इंग्रजांच्या विरुद्ध पहिलेंदा बंड पुकारून त्यांच्यावर विजय मिळवणाऱ्या वीर राणी कित्तूर चन्नमाच्या विजयला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भव्य कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात फिरून आलेल्या वीर ज्योतीचे कित्तूर येथे स्वागत करण्यात आले.
त्या नंतर कित्तूर संस्थानाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.वीर राणी कित्तूर चन्नमाच्या पुतळ्याचे पूजन करून पालक मंत्री सतीश जारकी होळी आणि महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर शोभायात्रेला प्रारंभ झाला.शोभायात्रेत संपूर्ण राज्यातून आलेली कलापथके सहभागी झाली होती.ईश्वराची आणि हनुमानाची वेशभूषा केलेले कलाकार शोभायात्रेच्या अग्रभागी होते.मत्स्य नृत्य,अश्व नृत्य करणाऱ्या कलपथकानी देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
महिलांचे ढोल पथक,पुरुषांचे भल्या मोठ्या हलगी घेतलेल्या पथकांनी देखील शोभायात्रेत रंग भरले.शोभायात्रेत शाळा,कॉलेजचे विद्यार्थी तसेच मंगल कलश घेऊन सुहासिनी सहभागी झाल्या होत्या. कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.