कॅम्पमधील रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी किरण निपाणीकर यांनी घेतला पुढाकार
कॅम्पमधील रहिवाशांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावे लागत असून त्यांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन परिसरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले.
त्यानुसार आज आमदार राजू सेठ आणि माजी नगरसेवक गौस धारवाडकर यांनी मार्केट स्ट्रीट कॅम्पमधील रहिवाशांसह कॅम्प, येथे नव्याने बांधलेल्या विहिरीचे उद्घाटन केले. यावेळी नागरिकांची गरज ओळखून निप्पाणीकर यांनी खुल्या विहिरीच्या बांधकामाचे नेतृत्व केले .
पाणी टंचाईमुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांच्या पुढाकाराने कॅम्प येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विहिरीचा उद्घाटन समारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ आणि माजी नगरसेवक गौस धारवाडकर उपस्थित होते .
अलीकडच्या काळात कॅम्प परिसरात पाणी टंचाईचे संकट गडद झाले होते. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांनी या ठिकाणी विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. या कामी त्यांना माजी नगरसेवक गौस धारवाडकर आणि मार्केट स्ट्रीट कॅम्प येथील रहिवाशांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळेच विहिरीचा हा प्रकल्प अल्पावधीत पूर्ण झाला. नव्याने बांधण्यात आलेल्या विहिरीमुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.