खानापूरच्या कराटेपटूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक
खानापूर – शनिवार, ९ ऑगस्ट रोजी शिमोगा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत खानापूर येथील व्ही एस के एफ कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत बलराज कळेकर यांनी सुवर्णपदक मिळवत आघाडी घेतली. प्रीतम असोगेकर आणि प्रीतम पाटील यांनी रौप्यपदकाची कमाई केली, तर सिद्धार्थ पाटील आणि साहिल कदम यांनी कांस्यपदक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले.
या सर्व खेळाडूंना कराटे मास्टर राहुल पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशामुळे खानापूरचा क्रीडा लौकिक वाढला असून, स्थानिक पातळीवरही कराटे क्रीडेबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.