खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितिच्या अध्यक्षपदी गोपाळ देसाई
17 जानेवारी हुतात्मा दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकताच, तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक येथे संपन्न झाले प्रारंभी नूतन तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई,कार्याध्यक्ष यशवंत बिरजे तसेच सचिव सिताराम बेडरे यांचा तालुका समितीच्या वतीने माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण, मारुती परमेकर, गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, आबासाहेब दळवी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला
.बाळासाहेब शेलार म्हणाले, सिमाप्रश्र्न मार्गी लागण्याहेतूने पाठपुरावा करण्यासाठी त्वरित पावले उचलने गरजेचं आहे. त्यासाठी उपक्रम हाती घेण्यात यावा. निरंजन सरदेसाई म्हणाले, चळवळीसाठी आता काटेरी वाट आहे. ती सर करण्याची ताकद मनात ठेऊन जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे. यावेळी
रणजित पाटील , रामचंद्र देसाई, अर्जुन देसाई,भैरू कुंभार, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, आदींनी विचार मांडले. सचिव सीताराम बेडरे यांनी आभार मानले.