*एक नोव्हेंबर मोठ्या गांभीर्याने पाळा, *खानापूर समितीचे आवाहन*
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नंदगड येथे खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. येणारा एक नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उपोषण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील जांबोटी, गर्लगुंजी, लोंढा, नंदगड व खानापूर शहरांमध्ये एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन करून पत्रके वाटली जाणार आहेत. एक नोव्हेंबर 1956 सालापासून आज पर्यंत मराठी भाषिक एक नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळतात यावर्षीही हा दिवस सुतक दिन म्हणून पाळून केंद्र सरकारचा गांभीर्याने निषेध करतील.
असे या बैठकीचे व एम ए समिती खानापूर अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांनी आपले मत मांडताना सांगितले. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते माजी सभापती सुरेश राव देसाई खानापूर युवा समिती अध्यक्ष श्री धनंजय पाटील संभाजी देसाई, पीएच पाटील, दत्तू कुठरे, श्री रवी पाटील व राजू पाटील उपस्थित होते.