दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली येथे दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने तिसरा श्रावण सोमवार उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा करण्यात आला.यावेळी केदारनाथाच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती तसेच मंदिरामध्ये अकरावा ज्योतिर्लिंग केदारनाथ ची पूजा देखील करण्यात आली.
यावेळी मंदिरात भाविकांनी वैष्णव देवी अमरनाथ केदारनाथ आणि जोतिबाची दर्शन घेतले. सकाळी पौरोहितांच्या हस्ते जोतिबाच्या मूर्तीला आणि शिवपिंडीला लघुरुद्राभिषेक करण्यात आला.
त्यानंतर वैष्णव देवीची ओटी भरण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता आरती करून भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.