कर्नाटक विधानसभेचे स्पीकर विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिली हलगा ग्रामपंचायतला भेट
हलगा ग्रामपंचायतीला कर्नाटक विधानसभेचे स्पीकर विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आज सकाळी 10 :00 वाजता भेट दिली आहे .यावेळी त्यांचा ग्रामपंचायतीच्या सत्कार करण्यात आला .
यावेळी त्यांनी गावात उद्भवणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच त्यांनी हलगा गावासाठी विधानसभेला गेलेल्या पाईपलाईन मधून दोन इंच पाणी देऊ असे आश्वासन दिले आहे .त्यानंतर त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले .
यावेळी हलगा ग्रामपंचायतचे चेअरमन सदानंद बेळगोजी व्हाईस चेअरमन सुजाता सुतार ,माजी चेअरमन गणपत मारीहाळकर व ग्रामपंचायत सदस्य सागर कामनाचे पिराजी जाधव , विलास परीट पीडीवो सेक्रेटरी उपस्थित होते.