कराटे कौशल्याची पर्वणी : बेळगांवात रंगला बेल्ट परीक्षा व ब्लॅक बेल्ट गौरव सोहळा
बेळगांव:स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बेलगावातील शानभाग हॉल, कॅम्प येथे कराटेपटूंना विशेष गौरव मिळाला. Complete Karate Academy Karnataka Trust आणि Shotokan India Organisation यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे बेल्ट परीक्षा तसेच ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ भव्यदिव्य पद्धतीने पार पडला.
या परीक्षेत एकूण १४५ रंगीत पट्ट्यांचे विद्यार्थी सहभागी झाले तर पाच निवडक कराटेपटूंना प्रतिष्ठेचा ब्लॅक बेल्ट सन्मान प्रदान करण्यात आला. या यशस्वी विजेत्यांमध्ये –
ओंकार रावल, त्रिनय ओगी, किशन तिग्गेंकेरी, लक्षय परब आणि स्वयम फाकरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक म्हणून कराटे गुरू जीतेन्द्र काकतीकर यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी एसएसएस फाऊंडेशनचे अध्यक्ष व कर्नाटक राज्य बॉडीबिल्डिंग अध्यक्ष डॉ. संजय सुंटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनचे कार्यकारी सदस्य अनिल अंबानी, बेनाकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्ष श्रीमती सायरा बानो हुक्करि, Complete Karate Academy चे उपाध्यक्ष डॉ. समीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमास विशेष महत्त्व लाभले.
कराटे अकादमीतील प्रशिक्षक मंडळ – अक्षय पर्मोजी, साहिर शेख, भूषण पाटील, ज्ञानेश्वरी काकतीकर व रमेश अलगुडिकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
या सोहळ्यामुळे बेलगावातील कराटेपटूंच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.