कन्नड चित्रपट ‘जोतयागी हितवागी’ १९ सप्टेंबरला राज्यभर प्रदर्शित
बेळगाव :
कन्नड चित्रपटसृष्टीत उभं राहणं तितकं सोपं नसतं. मात्र योग्य विषय आणि मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवता येतं, असं मत अभिनेते अगस्त्य यांनी व्यक्त केलं.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “उत्तर कर्नाटकातील चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. मात्र ‘जोतयागी हितवागी’ हा चित्रपट प्रेक्षकांना हृदयाला भिडेल असा आहे. वडील–मुलगा यांच्या नात्यातील गोडवा आणि प्रेमाची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे,” असं त्यांनी सांगितलं.
या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण बेळगाव परिसरात करण्यात आलं आहे. “या निर्मितीसाठी आमच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आधीच गाजत असून गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा अनुभवावा,” अशी मनापासूनची विनंती अगस्त्य यांनी केली.
‘जोतयागी हितवागी’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला राज्यभर एकाच वेळी प्रदर्शित होत असून, स्थानिक कलाकार व तांत्रिक चमूच्या मेहनतीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.