*कै. सतिश पाटील यांचे कार्य युवकांचे प्रेरणास्थान : केपिसिसी सदस्य श्री. मल्लगौडा पाटील*
*गौंडवाड येथे रक्तदान शिबिरात 40 जणांचे रक्तदान : विशेष व्याख्यानाचे आयोजन : 250 झाडांचे वृक्षारोपण यशस्वी निसर्ग संवर्धनाचा संदेश : सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य*
बेळगांव: तारीख 24 जून 2024 : ( प्रा. एन. एन. शिंदे ) बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना वाढली गेली पाहिजे, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. हीच सामाजिक बांधिलकी होय!’या संपूर्ण विश्वात आपल्या जीवनाइतके दुसरे महत्त्वाचे काहीही नाही. निसर्ग संवर्धन हे नैतिक तत्वज्ञान आणि संवर्धन चळवळ आहे ज्यामध्ये प्रजातींचे नामशेष होण्यापासून संरक्षण करणे, अधिवास राखणे आणि पुनर्संचयित करणे, परिसंस्था सेवा वाढवणे आणि जैविक विविधतेचे संरक्षण करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. निसर्ग संवर्धन हे नैतिक तत्वज्ञान आणि संवर्धन चळवळ आहे ज्यामध्ये प्रजातींचे नामशेष होण्यापासून संरक्षण करणे, अधिवास राखणे आणि पुनर्संचयित करणे , परिसंस्था सेवा वाढवणे आणि जैविक विविधतेचे संरक्षण करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते . मूल्यांची श्रेणी संवर्धन अधोरेखित करते, ज्याचे मार्गदर्शन जैवकेंद्री , मानववंशवाद , इकोसेंट्रिझम आणि संवेदना , पर्यावरणीय विचारसरणीद्वारे केले जाऊ शकते जे पर्यावरणीय पद्धती आणि ओळख सूचित करतात. पुराव्यावर आधारित संवर्धनाच्या दिशेने अलीकडे एक चळवळ झाली आहे ज्यामध्ये संवर्धन प्रयत्नांची परिणामकारकता सुधारण्यासाठी वैज्ञानिक पुराव्यांचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता आहे.
समाजसेवक धर्मवीर कै. सतीश पाटील हे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतीक, आर्थिक, धार्मिक, अध्यात्मिक, कला क्रीडा, सहकार, कृषी, आरोग्य, निसर्ग संवर्धन, आणि यासह सर्वच क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे समाजाच्या कल्याणासाठी अनेक वेळोवेळी मदत करून जनतेची सेवा केली आहे. कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या चे निवारण करून जनतेला मार्गदर्शन करणारा लढवय्या वेक्तीमत्व आहे. विद्यार्थ्यांना जीवनात परिपक्व आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत होते. बालगोपाल, विद्यार्थी आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याचे विविध प्रकारचे विपरीत दुष्प परीणाम याची वेळोवेळी जाणीव करून देऊन सुसंस्कारीत समाज घडविण्यासाठी सतीश पाटील हे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करीत होते.
वेगळ्या पद्धतीने धर्मवीर कै. सतिश पाटील हे समाजात सामाजिक कार्यकर्ते म्हणून सेवा करत होते; यांच्या विचारसरणीचा सामाजिक बांधिलकी जपून नव्या पिढीनी समाजसेवेचे व्रत आता हाती घ्यायला हवे आणि ते हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे येऊन, चांगले विचार घेऊन कार्य करायला हवे. सतीश पाटील यांनी जे विचार समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा; आणि तुम्ही तो त्यांचा वारसा जपत आहात अभिमानास्पद आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला तो विचार पुढे घेऊन जाऊन प्रत्येकांनी दूरदृष्टी ठेवून कार्य करायला हवे; चांगले समाजाला दिशा देण्याचे कार्य युवकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे ते करण्यासाठीं समाजसेवक धर्मवीर सतीश पाटील यांच्या नावाने संघटना काढून गोरगरिबांची सेवा करत आहात एक अभिमानाची गोष्ट आहे; त्यासाठी एकत्र येऊन मित्रपरिवाराने विचार विनियम करून *संघटनेच्या माध्यमातुन समाजात क्रांतिकारी कार्य केल्याने नवे परिवर्तन होताना पाहून कै. सतिश पाटील कार्य नव युवकांचे प्रेरणास्थान बनले आहे हे बघून अत्यंत अभिमान वाटतो “” *समाजसेवेतून देशभक्ती -निसर्ग संवर्धन एक काळाची गरज आणि *कै. सतिश पाटील यांचे सामाजिक योगदान नवे प्रेरणास्थान”” या विषयावर केपिसिसी सदस्य श्री. मल्लगौडा पाटील* प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
समाजसेवक धर्मवीर कै. सतिश पाटील सामाजिक संस्था बेळगांव, ता. / जि. – बेळगांव आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज प्रायव्हेट कॉपरेटिव्ह लिमिटेड बेळगाव आणि देवस्की पंच कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्ट गौंडवाड येथे कै. सतिश पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिर, विशेष व्याख्यानाचे आयोजन, वृक्षारोपण निसर्ग संवर्धन चळवळ उपक्रम रविवार दिनांक रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रम भव्य मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी मोठा उत्साह दिसून आला मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीत भारुडी भजनाचे प्रमुख ज्येष्ठ ह भ प रुक्मांन्ना कल्लाप्पा पाटील होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सतिश जरकीहोळी यांचे मुख्य सहाय्यक अधिकारी व केपिसीसी सदस्य श्री मल्लगौडा पाटील , कांग्राळी बी.के. ग्रामपंचायतचे सदस्य यल्लोजी तानाजी पाटील व बाबू दोड्डमनी, बेळगांव जील्हा रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. सुधीर वाय. हालभावी, डॉ. वर्षा घोडके, डॉ . आर .जी. पाटील, डॉ. ज्योती मेलगे, डॉ. श्रीदेवी बाबले , शशिकला कुरणे, उमा पाटील, प्रेमा मोतेबेन्नुर व्यासपीठावर उपस्थित होते.
फोटो पूजन ज्येष्ठ विचारवंत हभप श्री. भाऊराव पवार, प्रकाश काकातीकर, वसंत पाटील, सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन राजू पाटील, नागराज पाटील, सुधाकर चौगुले, देवस्की पंच कमिटीचे सदस्य दिलीप चौगुले, कल्लाप्पा मुतगेकर, यमनापुर येथील ओम केबल ओपरेटरचे मालक जोतिबा पाटील, लोकेश पाटील यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
*गौंडवाड येथे एक दिवसीय उपक्रमात रक्तदान शिबिरात 40 तरुणांनी रक्तदान केले. यावेळी “” *समाजसेवेतून देशभक्ती -निसर्ग संवर्धन एक काळाची गरज आणि *कै. सतिश पाटील यांचे सामाजिक योगदान नवे प्रेरणास्थान”” या विषयावर केपिसिसी अध्यक्ष श्री. मल्लगौडा पाटील* यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. विविध जातींची 250 झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन अनेक विविध सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले आहे.*
स्वागत उमेश पाटील तर प्रास्ताविक महादेव निलजकर यांनी केले. परिचय महेश संभाजी पिंगट यांनी करून दिला. सूत्रसंचालन गजानन कुट्रे व मोहन नाथबुवा यांनी केले. तर ओमकार काकतकर यांनी आभार मानले.
यावेळी जोतिबा निलजकर, अमर पाटील, सचिन पाटील, विनायक पाटील, निवास पाटील, आकाश पाटील, जोतिबा महादेव पाटील, हरी पवार , सूरज पाटील, शुभम काकतीकर, यल्लाप्पा भुगोलकर, शांताराम पवार, रतन काकतीकर, विनायक पवार, निवृत्त सुभेदार दयानंद बुवा तसेच गावातील विविध मंडळे व महिला मंडळे आणि रोजगार हमी योजनेच्या पदाधिकारी, सदस्या, सदस्य कर्मचारी , विद्यार्थी पालक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.