ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आंतरशालेय स्पर्धेत नेत्रदीपक यश
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्यने आयोजित केलेल्या आंतरशालेय गायन आणि नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या स्पर्धेत २५ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल शाळेत आनंदाचे वातावरण असून, सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अक्षता मॅडम आणि प्रफुल्ल सर यांचे विशेष आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या एस.एम.सी. कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर.एस.पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला.