| Latest Version 9.0.7 |

Sports News

*ज्युनिअर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये निधी कुलकर्णीची चमकदार कामगिरी*

*ज्युनिअर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये निधी कुलकर्णीची चमकदार कामगिरी*

ज्युनिअर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये निधी कुलकर्णीची चमकदार कामगिरी – 100 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य पदकाची कमाई

बेळगाव: बेळगावची जलतरणपटू निधी सदानंद कुलकर्णी हिने पुन्हा एकदा पाण्यातील आपले वर्चस्व सिद्ध करत ५१व्या ज्युनिअर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये झळाळते रौप्य पदक पटकावले. कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना, 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात तिने अवघ्या 01:07:00 मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत सुवर्णपदक केवळ क्षणांच्या फरकाने हुकवले.

स्विमर्स’ क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावची ही गुणवान जलतरणपटू सध्या KLS पब्लिक स्कूल, पीरनवाडी येथे शिक्षण घेत असून, अभ्यासातील शिस्त आणि जलतरणातील निष्ठा यांचा सुंदर संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.

निधीच्या यशामागे KLEच्या सुवर्ण JNMC ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल येथे झालेला कठोर सराव आणि तिची कोचिंग टीमचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षक उमेश कालघटगी, अक्षय शिरगेर, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक अंबेवाडकर यांनी तिला तांत्रिक कौशल्य आणि मानसिक तयारीची उत्तम जोड दिली आहे.

तिच्या वाटचालीत प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये KLE Societyचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. जयंतीलाल हुम्बरवाडी, रोटेरियन अविनाश पोटदार, सौ. मॅनेक कपाडिया, सौ. लता किट्टूर, सुधीर कुसणे, प्रसाद तेन्दोलकर आणि अन्य शुभेच्छुकांचा मोठा सहभाग आहे.

निधी कुलकर्णीच्या या कामगिरीमुळे बेळगावच्या जलतरण विश्वात अभिमानाची नोंद झाली असून, तिच्या आगामी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची उत्सुकता क्रीडाप्रेमींत वाढली आहे.


Deepak Sutar
the authorDeepak Sutar
WhatsApp

Don’t Miss Out! Join Our WhatsApp Group Today!

Get the latest news, updates, and exclusive content delivered straight to your WhatsApp.

Powered By KhushiHost

";