बेळगाव:राजधानी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या ३ ऱ्या राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक गेम्स – २०२४ मध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या बेळगाव डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो खेळाडूंचे आज बेळगाव रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कंठिरवा इनडोअर स्टेडियम, बेंगलोर येथे गेल्या १४ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत ३ ऱ्या राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक गेम्स अर्थात खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये बेळगाव डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो खेळाडूंनी ७ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकाची कमाई केली आहे. या यशस्वी खेळाडूंची नावे भवानी आतदकर, कावेरी सूर्यवंशी, सहाना बेळगली, वैष्णवी भांडगे, आलिया मुल्तानी, सोपान आरगे, कार्तिक तुर्केवाडी (सर्व सुवर्ण), आरती मुरकुटे (रौप्य) आणि कनिष्क भोगण (कांस्य) अशी आहे बेंगलोर येथून आज सोमवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झालेल्या या सर्व यशस्वी ज्युडो खेळाडूंचे मानाचा फेटा बांधून उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
सदर खेळाडूंना एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुल्तानी यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह डीवायईएस विभागाचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन लाभत आहे.