बेळगाव : लोहार गल्ली, अनगोळ येथील जिनाप्पा वस्ताद तालमीचा ६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यानिमित्त महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले.नववर्षाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.त्याचबरोबर युवकांनी व्यसनाधीन न होता व्यायामाकडे वळण्याची गरज आहे.आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे यामुळे आपले शरीर सुदृढ बनते व निरोगी राहण्यास मदत होते. असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सुधीर भेंडीगिरी, मुकुंदा ताशिलदार, परसराम जवरुचे, रमेश कलखांबकर, सागर लोहार, भावेश ताशिलदार, बसवराज सूनगार, अनंत ताशिलदार , समर्थ सुतार , विनायक लोहार, मनीष पाटील, बसवराज अंगडी लक्ष्मण ताशिलदार यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.