राजकीय व्यक्तींचे बाहुले बनून पोलीस अधिकारी कार्य करत असल्याचा गंभीर आरोप
श्री राम सेना हिंदुस्थानचे राज्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्याचे वर्चस्व असल्याचा आरोप आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला .
यावेळी त्यांनी राजकीय व्यक्तींचे बाहुले बनून पोलीस अधिकारी कार्य करत असल्याचा गंभीर आरोप केला.आज बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दक्षिण मतदारसंघात गांजा अफूसह बेकायदेशीर अमली पदार्थांचे कारवाया सुरू आहेत, त्याविरोधात हिंदू कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जाते.
या प्रकरणात प्रामुख्याने टिळकवडी पोलीस ठाण्याच्या सीपीआयसह दोन पोलीस हवालदार हे मुख्य आरोपी असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती पोलीस आयुक्तांना केली.आणि या प्रकरणी त्यांनी काही फोटो देखील प्रसिद्द केले
यावेळी ते म्हणाले की टिळकवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन किलो गांजा सापडला आहे. मात्र या प्रकरणी पोलीस मूग गिळून गप्प बसले आहेत
पोलीस अधिकारी आरोपींशी हातमिळवणी करून योग्य अधिकाराशिवाय बेकायदेशीर धाडी टाकत आहेत . बेळगावातील आरपीडी महाविद्यालयाच्या परिसरात हा ड्रग माफिया बसल्याचे पुराव्यासह कागदपत्रे सापडली असून, हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक न करता राऊडी शीटर आणि कायद्यांतर्गत अटक केली जात आहे, हे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी आरपीडी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुन्हेगारांचा सहभाग आहे.राऊडी शीटर, गुंड कायद्यांतर्गत युवकांवर गुन्हा दाखल करून अन्याय करणे निंदनीय आहे असे सांगितले .