बेळगावचे सुपुत्र आणि ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठात न्युरोसायंटिस्ट म्हणून कार्यरत असणारे डॉ. गौतम वाली यांना जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत डॉ. गौतम यांनी व्याख्यान देऊन आपले संशोधन सादर केले. डॉ. गौतम हे सिडनी विद्यापीठात न्युरोसायन्स रिसर्च सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.पार्किंनसन्स म्हणजे पक्षाघात या विषयावर त्यांचे संशोधन सुरु आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी मायाटोकॉड्रीयल डिसफंक्शन इन
पार्किंनसन्स डिसिज या विषयावर व्याख्यान दिले.डॉ. गौतम यांचे संशोधन महत्वपूर्ण असून यामुळे पार्किंनसन्स रुग्णावर आधुनिक पद्धतीने उपचार करणे शक्य होणार असल्याचा अभिप्राय उपस्थित ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी व्यक्त केला. बेळगावातील प्रख्यात न्युरोलॉजिस्ट डॉ. जी. एम. वाली यांचे डॉ. गौतम हे सुपुत्र आहेत. डॉ. गौतम हे क्लब रोडवर अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक पार्किंनसन्स केअर आणि रिसर्च सेंटर सुरु करणार आहेत.
D Media 24 > State > *जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित*
*जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित*
Deepak Sutar18/04/2025
posted on


Leave a reply