मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
21 जून 2023 रोजी मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रख्यात योगगुरू मोहन बागेवाडी आणि पतंजली योग समिती बेळगाव येथील शंकर कुद्री उपस्थित होते .
तसेच यंदा योग दिनाची थीम होती ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ अर्थात ‘एक विश्व-एक कुटुंब’ या स्वरूपात सर्वांच्या कल्याणासाठी योग महत्वाचा आहे ,योगाचा आत्मा जो सर्वांना एकत्र आणतो अशी होती.
यावेळी मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा डॉ.राजश्री नागराजू यांनी संस्थांमध्ये योगाभ्यास चांगला होण्यासाठी प्रोत्साहन दिले.यावेळी प्राचार्य श्री आर एस सुर्यवंशी यांनी योगासनांचे दररोजचे महत्त्व पटवून दिले.
उपमुख्याध्यापिका श्रीमती आशा पी तोरवी यांनी योगाचे पालन करून निरोगी जीवनशैली आणि तणावमुक्त जीवन यावर आपले विचार व्यक्त केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला