*आंतरराज्य जलतरण स्पर्धा उत्साहात पार*
कर्नाटका महाराष्ट्रा आणि गोवा राज्यातील आयोजित 20 व्या विविध गटातील जलतरण स्पर्धेला सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पार पडल्या केएलई अकॅदमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलगुरु डॉ नितिन गंगणे, केलई कॉन्सर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम व्ही जाली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
एफीशियंड डेव्हलपर्सचे मुख्य यवस्थापिक संचालक प्रवीण पाटील, अलाईड फौंडरचे मुख्य यवस्थापिक संचालक राम मल्ल्या, पॉराओलॉम्पिक समिती ऑफ इंडियाचे सरचिटणीस जयवंत हांनमंनवर, कर्नाटका स्विमिंग असो चे मानद सचिव एम सतिश कुमार, भारतीय स्विमिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष जी एस बैलकेरी, स्वीमर्स क्लबचे उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे, इंद्रजीत हलगेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 450 च्या वर स्विमर्सनी सहभाग घेतला होता आरोग्य आणि पोहण्याचे महत्व पटवून देणेसाठी तरुण व वयस्कर व्यक्तीना विशेष स्पर्धा घेण्यात आली तसेच वेगवान जलतरणपटटूना गौरवण्यात आले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्विंमर्स क्लब चे पदाधिकारी, प्रशिक्षक , स्टाफ आणि पालकवर्ग यांनी सहकार्य केले.
,