गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकमान्य टिळक गणेश महामंडळ याच्या मागणी नुसार मिरवणूक मार्गावरील विविध चौकात लोंबकळत असलेल्या विधुत तारा शुक्रवारी सकाळी शहर अभियंता संजीव हमन्वर यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आले यावेळी उपस्थित लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव गिरीष धोंगडी ,सुनिल जाधव उपस्थित होते
सकाळी विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गवर लोंबकळत असलेल्या विद्युुत तारा, संदर्भात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मंडळ पदाधिकार्यांच्या सूचनांचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कुमार गंधर्व येथे झालेल्या बैठकीत करण्यात. आला होता.त्यानुसार 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सवात कोणतीही विद्युुत समस्या वा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शुक्रवारी हेस्कॉमचे शहर अभियंता संजीव हमन्वर यांनी नियोजनाची दिशा ठरवली.
हेस्कॉमचे शहर अभियंता संजीव हमन्वर, सेकशन अभियंता सय्यद विद्युुत वितरण,कर्मचारी सीताराम सरनोबत, रवी चलवादी, तसेच अन्य विद्युुत,कर्मचारी व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील जाधव,रवी कलघटगी यांसह गणेशोत्सव मंडळ पदाधिकार्यांच्या उपस्थित विविध भागातून पाहणी दौरा करण्यात आला.