बेळगाव : येत्या 5 जानेवारी रोजी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने कुस्ती आखाडा भरवण्यात आला आहे. या आखाड्याची पूर्वतयारीची पाहणी गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली व आखाड्यात मंडप, मैदानाचे सपाटीकरण, महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग, महिला, व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मारूती घाडी, कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, सेक्रेटरी संतोष होंगल, तांत्रिक कमिटी अध्यक्ष पै. अतुल शिरोले, खजिनदार भरमा पुणुजीगौडा, माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई, सुहास हुद्दार, नरहरी माळवी आदी उपस्थित होते.