मनपा महापौर तसेच आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
मनपा आयुक्त अशोक दुडंगुडी यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.
महापालिका आयुक्त अशोक दुडंगुडी ,शहर अभियंता सचिन कांबळे, महापौर शोभा सोमनाथचे ,उपमहापौर रेश्मा पाटील, हेस्कॉमचे अभियंता सुनील कुमार, अश्विन शिंदे, संजीव हमनावर,फॉरेस्टशहर रेंजर विनोद गौडर, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, अर्जुन रजपूत, सुनील जाधव, अरुण पाटील, प्रवीण पाटील, रोहित रावळ,जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, रणजित पाटील, सागर पाटील, नगरसेवक गिरीश धोंगडी, राजू भातकांडेजयतीर्थ सौन्दती, संतोष पेडणेकर, नितीन जाधव,
यांच्यासह अधिकार्यांबरोबर मिरवणूक मार्गाची पाहणी केली. खडेबाझर येथून गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजीराजे चौक, टिळक चौक, हेमू कॉलनी चौक, शनी मंदिर, छत्रपती शिवाजी उड्डाणपूल, कपलेश्वर तलाव या मार्गाने गणेश विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार या मार्गाची पाहणी करत अधिकार्यांना विविध सूचना केल्या. यावेळी मनपा शहर अभियंता सचिन कांबळे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक पूर्व, पश्चिम विभागातील स्वच्छता निरीक्षक पाहणी दौर्यास उपस्थित होते.