बेळगाव: शहरापासून जवळच असलेल्या शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेता बेळगाव ग्रामीणचे आमदार तसेच महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीतील दुरवस्था झाले रस्ते,गटारी तसेच मुसळधार पावसामध्ये पडलेल्या घरांची पाहणी केली.
याप्रसंगी युवानेते मृणाल हेब्बाळकर बोलताना म्हणाले की मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी केली आहे.तसेच या मुसळधार पावसामध्ये एकूण कंग्राळी ग्रामपंचायत हद्दीतील १२ ते १३ घरे कोसळली असून त्यांना लवकरच सरकारकडून नुकसान भरपाई उपलब्ध करून देऊ तसेच शाहूनगर ते कंग्राळी बिके चा प्रमुख रस्ता पाऊस आटोक्यात आल्यानंतर आमदारांना सांगून हा रस्ता करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. व त्यांच्या लक्ष्मीताई फाउंडेशन तर्फे घर कोसळल्या लोकांना प्रत्येकी ५००० रुपयाची आर्थिक मदत केली.
याप्रसंगी कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत अध्यक्ष कैसर बंदे नवाज सय्यद, ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, यल्लोजीराव पाटील, अनिल पावशे, बंदेनवाज सय्यद, सध्या राजकट्टी,दत्ता पाटील, दादासाहेब बद्दरगडे, मल्लेशी बुडरी, तानाजी पाटील, मेनका कोरडे,अर्चना पठाने, व्यवसायिक विजय पावशे, बजेन्त्री, श्रीकांत लमानी,शंकर कोनेरी,पी.डी.ओ.गोविंद रंग्यापगोळ, तलाठी दयानंद कुगजी, यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.