दक्षिण मतदार संघात अनेकांवर अन्याय
दक्षिण मतदार संघात अनेकांवर अन्याय झाला आहे त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून राज्यात सक्रिय होण्याची इच्छा आज बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट प्रभू यत्नेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
शहरात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी आपण काँग्रेस पक्षातून निवडणूक लढण्यास दक्षिण मतदार संघात इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
तसेच दक्षिण मतदार संघात आमदारांचा कशाप्रकारे मनमानी कारभार चालू आहे याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत पाढा वाचला असून एक व्यक्ती समाजाला किती घातक आहे तसेच त्याला आता निवडून दिल्यास आपल्या डोक्यावर बसून पुन्हा मिऱ्या वाटेल असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच त्यांनी या पत्रकार परिषदेत दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील जनतेला कोणत्याही सब रजिस्टर कार्यालयात मालमत्ता खरेदी विक्री नोंद करण्याची मुभा द्यावी अशी मागणी देखील केली आहे.