हिंदवाडी–आनंदवाडीनंतर इंद्रप्रस्थ नगरातही नाविन्यपूर्ण उपक्रम
बेळगाव :
आमदार अभय पाटील यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक नितीन जाधव यांनी आपल्या प्रभागात सातत्याने नवे उपक्रम राबवून एक वेगळी छाप निर्माण केली आहे.
हिंदवाडी व आनंदवाडीत डिजिटल साइनबोर्ड उभारल्यानंतर त्यांनी आता इंद्रप्रस्थ नगर परिसरात जक्कीर होंडा येथे दोन मोठ्या निर्माल्य कुंडांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी नागरिक तलावातच निर्माल्य विसर्जन करत होते. त्यावर पर्यावरणपूरक तोडगा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली.
नितीन जाधव यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांना विनंती केली होती. त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत निर्माल्यकुंडांची सोय करून दिली. या उपक्रमामुळे इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी समाधानी असून त्यांनी आमदार अभय पाटील, नगरसेवक नितीन जाधव आणि आयुक्त शुभा बी. यांचे आभार मानले आहेत.
या प्रसंगी सुनील काकतकर, आसावरी भोकरे, राजेंद्र रेवणकर, सुरेश लिंबिकाय, श्रीकांत देशपांडे, सुदर्शन आजगावकर, विरेश मलिमठ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.