भारत दिमाखात अंतिम फेरीत
अंडर- 19 आशिया चषक
दुबई:अंडर 19 आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने श्रीलंकेचा सात गड्यांनी पराभव केला आहे.
भारताच्या या विजयामध्ये वैभव सूर्यवंशीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांनी 24 चेंडू मध्ये अर्धशतक केले. त्याने फक्त 36 चेंडूमध्ये सहा सणसणीत चौकार आणि पाच उत्तुंग षटकारांच्या मदतीने 67 धावांची तुफानी खेळी केली. पहिल्या विकेटसाठी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी 91 धावांची भागीदारी केली. येथेच भारताच्या विजयाचा पाया रचला गेला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. श्रीलंका संघ 50 षटके ही खेळू शकला नाही. भारताचा कर्णधार मोहम्मद अमान यांने षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. यामुळे टीम इंडिया नवव्यावेळी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात फायनल मध्ये पोहोचली आहे. रविवार आठ डिसेंबर रोजी भारताचा बांगलादेश विरुद्ध अंतिम सामना होणार आहे. बांगलादेश ला पराभूत करून टीम इंडिया आशिया चषकावर आपला दावा सिद्ध करणार आहे.