तलाव मध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना
दोन व्यक्तींनी कपिलेश्वर तलावाच्या मागच्या बाजूस असलेल्या तलावामध्ये उडी टाकून आत्महत्या केली आहे त्यामुळे या घडलेल्या घटनेनेने शहरात खळबळ माजली आहे.
आज सकाळी काही युवक तलावामध्ये पोहायला गेले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला यावेळी त्यांनी ही माहिती लागलीच पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली.
तलावामध्ये आढळलेले हे दोन्ही मृतदेह एक स्त्री आणि पुरुषाचे असून दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला यातील एकाचे वय 55 ते 65 वर्षे असल्याचे असून ते बाहेरगावचे असल्याचा संशय आहे.
मृतदेह पाण्यावर तरंगत असल्यास हे दोन्ही दाम्पत्य आहेत का अन्य कोणी याचा पोलीस तपास घेत असून घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलिसांचा पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी घाव घेत पुढील कार्य हाती घेतले.