औद्योगिक कामगारांच्या सेवेसाठी वेलनेस सेंटरचे लोकार्पण
बेळगावच्या दक्षिण भागातील आणि खानापूर तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी KLE शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल, येळ्ळूर रोड, बेळगाव येथे 2016 मध्ये कार्यान्वित करण्यात आले.
KLE वेलनेस सेंटर औद्योगिक कामगारांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या भागातील गरजू लोकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा पुरवणार आहे . हे अशा प्रकारचे पहिले वेलनेस सेंटर आहे.आणि KLES वेलनेस सेंटरच्या उद्घाटन समारंभ आज थाटात पार पडला.
हे हॉस्पिटल तीन वैशिष्ट्यांमधून उपचार देते जसे की; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी सेवा देखील समाविष्ट आहेत. 24X7 आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका सेवा आणि फार्मसीसह उपलब्ध आहेत. आणि आज या सेंटरचा उदघाट्न समारंभ राम भंडारे, अध्यक्ष बेळगाव फाउंड्री क्लस्टर, श्री. महादेव चौगुले, अध्यक्ष लघुउद्योग संघटना, श्री. हेमेंद्र पोरवाल, अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. दयानंद नेतळकर, अध्यक्ष लघु उद्योग भारती आणि श्री. जयंत हुंबरवाडी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अशोक आयर्न वर्क्स प्रा. लिमिटेड बेळगावयांच्या उपस्थितीत पार पडला.