शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
बेळगाव दि. ०७. : यश कम्युनिकेशन्स व यश इव्हेंट्सच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात शॉपिंग उत्सव या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षा वंदना पुराणिक,खुला बाॅक्सचे संचालक रईस खान, यश आॕटोचे संचालक संजय मोरे, रोटेरियन महांतेश पुराणिक, विकास कलघटगी, मैनुद्दीन खान गुड्डूभाई, विनय कदम, रणजित मन्नोळकर मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यश कमिनिकेशनचे सःचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि गेल्या 30 वर्ष होऊन अधिक काळापासून आपण विविध प्रकारची प्रदर्शने भरवीत आहोत त्याला बेळगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला नवीन उमेद मिळाली असे सांगितले.
“यश कमुनिकेशद्वारा ऑटो एक्सपो, बेल्काॕन, लाईफस्टाईल, कृषी प्रदर्शन, इंटरियर एक्स्टरियर, हँडलूम हँडीक्राफ्ट यासारखी प्रदर्शने भरवून बेळगावकरांना नवीन उत्पादनांची माहिती आम्ही दिली” आहे असे प्रकाश कालकुंद्रीकर म्हणाले.
चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षा वंदना पुराणिक यांनी या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तर बेळगावकरांना अशा प्रदर्शनाद्वारे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी विनय कदम यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी यश ऑटोचे संजय मोरे, विकास कलघटगी, खुला बॉक्सचे रईस खान, गुड्डूभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन मंगळवार दि. 11 मार्च पर्यंत चालणार आहे.