गौंडवाड येथे एस.एस. एल. सी. व्याख्यानमालेचे उदघाटन
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल गोंडवाड येथे एस.एस. एल. सी. व्याख्यानमालेचा उदघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याद्यापक श्री. पी. ओ. पाटील यांनी केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी श्री. यल्लोजीराव पाटील (ग्राम पंचायत उपाध्यक्ष बी. के. कंग्राळी) संपनमूल व्यक्ती श्री. युवराज पाटील अग्रसगे हायस्कूल तसेचे श्री एन. वाय. पिंगट उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुखे पाहूण्यांची भाषणे झाली. यावेळी यल्लोजीराव पाटील आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, ध्येय काय असते ते विद्यार्थ्यांना उदहारणासह पटवून देत शुभेच्छा व्यक्त दिल्या .
या व्याख्यानमालेसाठी यल्लोजीराव पाटील, भारती संदिप सुळेभावीकर यांनी भरघोस देणगी ‘देवून सहकार्य केले. या कार्यक्रम प्रसंगी जे. पी. अंगसीमणी जी.एस. धामणेकर, कविता गौंडाडकर, प्राती पाटील, एस. एन. गावडे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एस. धामणेकर यांनी केले तर आभार पूजा जाधव यांनी मानले