बेळगांवात स्कायवर्ल्ड Academy चे उद्घाटन : एव्हिएशन, ट्रॅव्हल, रिटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी नवा अध्याय
बेळगांव: सेवा उद्योगातील वाढत्या संधी लक्षात घेऊन बेळगांवात स्कायवर्ल्ड Academy या अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन झाले. एव्हिएशन, टुरिझम, ट्रॅव्हल, रिटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत रोजगाराभिमुख करिअर घडवणे, हा या संस्थेचा उद्देश आहे.
२५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले एव्हिएशन तज्ज्ञ विनोद बामणे यांच्या नेतृत्वाखाली ही अकादमी सुरू झाली आहे. या उपक्रमाला उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ कृष्णन अय्यर आणि फॅबियन फरेरा यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष उद्योगातील अनुभवाची जोड मिळणार आहे.
उद्घाटनावेळी बोलताना संस्थापक बामणे म्हणाले, “स्थानिक पातळीवरच्या तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन करिअरच्या संधींची दारे खुली करण्याचे आमचे ध्येय आहे. बेळगांवातून सुरुवात करून आम्ही राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत ब्रँड तयार करू.”
भारतामध्ये एव्हिएशन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर स्कायवर्ल्ड Academy विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये, प्रमाणपत्रे आणि प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
अकादमीची वैशिष्ट्ये
अनुभवी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष व व्यावहारिक प्रशिक्षण
शिक्षणापासून नोकरीपर्यंत संपूर्ण करिअर मार्गदर्शन
भारताच्या सेवा क्षेत्राला पूरक असा राष्ट्रीय प्रतिभा पूल घडविण्याचा संकल्प
बेळगांवातून सुरू झालेला हा प्रवास लवकरच देशव्यापी स्वरूप घेणार आहे. एव्हिएशन, ट्रॅव्हल, रिटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कायवर्ल्ड Academy हा “विश्वासाचा पत्ता” ठरणार आहे.