*बेनकनहळी येथे क्रिकेट नेटचे उद्घाटन*
**बेळगाव** : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळी गावात तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय पातळीवर सराव करण्यासाठी नवीन क्रिकेट नेट बनविण्यात आले आहे. बेनकनहळी क्रिकेट असोसिएशनने ही सुविधा गावातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून केले आहे. https://dmedia24.com/world-book-day-celebration/
या क्रिकेट नेटचे औपचारिक उद्घाटन ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गावातील तरुण खेळाडू, त्यांचे पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते. क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सुनील खांडेकर यांनी सांगितले, *”या सुविधेमुळे ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळेल. भविष्यात ते उच्च स्तरावर यशस्वी होतील, याची आम्हाला खात्री आहे.”*
उद्घाटन समारंभात स्थानिक उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी प्रात्यक्षिक सराव सत्र घेऊन सर्वांचे कौतुक मिळवले. ही नेट सुविधा आता नियमितपणे सर्व खेळाडूंसाठी खुली असेल, तसेच इच्छुक युवकांनी यात सक्रिय सहभाग द्यावा, अशी आवाहन आयोजकांनी केली आहे.
या पायाभूत सुविधेमुळे ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.