*येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन*
येळ्ळूर झोनल पातळीवरील वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून श्री विपुल पाटील यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री विपुल भाऊराव पाटील यांच्याकडून मेडल व चषक तसेच श्रीमती सविता शिवाजी मुरकुटे यांच्याकडून सर्टिफिकेटस् देणगी दाखल देण्यात आले . त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक एम्. बी. पाटील आणि देसूर शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस्.डी.एम्. सी. अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री सतीश बाळकृष्ण पाटील, येळ्ळूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महेश जळगेकर, धामणे केंद्राच्या सीआरपी श्रीमती शिवलिला विरक्तीमठ, देसुर केंद्राच्या सीआरपी श्रीमती प्रिया चोपडे, शाळेचे एस्.डी.एम्.सी. उपाध्यक्ष आणि सदस्य, तिन्ही केंद्रातील मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक आणि सहशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस्.बी. पाखरे, प्रास्ताविक येळळूर केंद्राचे सीआरपी महेश जळगेकर, पाहुण्यांचे स्वागत श्रीमती एस्. एस्. बाळेकुंद्री, पाहुण्यांचा सत्कार श्रीमती ए.वाय.मेणसे, आभार प्रदर्शन शाळेचे शारीरिक शिक्षक श्री एस्. पी. पाटील यांनी केले.