मराठा युवक संघ आयोजित19 वी आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ
बेळगाव: ,मराठा युवक संघ आयोजित 19 वी आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने आज करण्यात आला. स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे हिंद सोशल क्लबचे अध्यक्ष आर्किटेक्ट अरविंद संगोळी व बांधकाम व्यावसायिक अनुप जवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पुतळ्याचे पूजन करून करण्यात आला.
प्रारंभी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविकात मराठा युवक संघ गेली 58 वर्षे बेळगावात आयोजित करत होती परंतु किल्ला तलावातील पाणी गढूळ झाल्याने त्या स्पर्धा बंद करून आता गत 18 वर्षे शहरातील स्विमिंग पूलमध्ये घेण्यात येत आहेत. गत दोन वर्षांपासून आंतरराज्य आंतरशालेय स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 ते 400 स्पर्धक भाग घेत आहेत. यामुळे आम्हास स्पर्धा घेण्याचे समाधान वाटत आहे.
यावेळी आबा क्लबचे विश्वास पवार, मराठा युवक संघाचे सदस्य शेखर हंडे, महेश चौगुले, विनोद हंगिरगेकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे, विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर, सुहास किल्लेकर, गणेश दड्डीकर उपस्थित होते.
चंद्रकांत गुंडकल यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास किल्लेकर यांनी केले तर चंद्रकांत गुंडकल यांनी आभार मानले.