येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारालाच तिकीट द्यावे
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र तारे आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची कीर्ती अजरामर असल्याचे प्रतिपादन मराठा समाजाचे स्वामी यांनी केले. त्यांनी सुवर्णसौद येथे आंदोलनावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजाला 3 बीमधून 2A मध्ये आरक्षण मिळावे. मराठा समाजाने जे सुवर्णसौध येथे जे आंदोलन केले या ठिकाणी न भूतो न भविष्यती अनुभूती आली.त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 हजाराहून अधिक मराठा समाज भगवे फेटे आणि गळ्यात भगव्या शाल घालून उपस्थित होते. नागरिकांनी हा दिलेला प्रतिसाद पाहून चांगलेच धाबे दणाणलेले चे समजते.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता युवकांकडे सरकारने आरक्षण जारी करावे. तसेच त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे असे सांगितल्यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आपण सर्वांना आरक्षण मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे.
यावेळी मराठा समाजाच्या स्वामींनी उत्तर कर्नाटकात मराठा समाजाच्या नागरिकांची संख्या प्रत्येक क्षेत्रात 40 टक्क्यांवर असल्याचे सांगितले. मात्र याकडे राष्ट्रीय पक्षांचे दुर्लक्ष झाले असल्याने हा समाज सर्व वंचित झाला असल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारालाच तिकीट द्यावे असे विनंती केली.