“जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत 180 विद्यार्थ्यांची झुंज; 24 जण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड”
बेळगाव : अँगडी पीयू कॉलेज, सांगाव रोड येथे प्री-युनिव्हर्सिटी बोर्डाच्या वतीने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अंडर-19 जिल्हा स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सुमारे 180 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य संजीव कुमारमठ, कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर, डॉ. अमित जाडे, व्ही. एस. पाटील, शारीरिक शिक्षण संचालक विशालनाथ धामोणे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतून 13 मुले व 11 मुली अशा एकूण 24 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेला तांत्रिक सहाय्य बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनचे सरचिटणीस व मुख्य पंच जितेंद्र काकतीकर तसेच गजेन्द्र काकतीकर यांनी दिले. अधिकृत पंच म्हणून सुहास व लक्ष्मण नायक, नताशा अष्टेकर, विनायक दांडकर, शाहीर शेख, अमित वेसणे, राजा राजपूत, भूषण पाटील, चंदन जोशी, अक्षय पर्मोजी व परशुराम काकती यांनी काम पाहिले.