तुरमुरीत समितिच्या प्रचार फेरीत जनसागर उसळला
तुरमुरीत, ता. 28 :
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या तुरमुरी येथील प्रचार फेरीत जनसागर उसळल्याचे चित्र शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी निघालेल्या फेरीत दिसून आले. मराठी युवकांबरोबर महिलाही भगवे झेंडे हातात घेऊन फेरीत सक्रिय झालेल्या दिसून आल्या.
प्रारंभी वेशीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये महिलांनी उमेदवाराला आरती ओवाळून आशिर्वाद दिले. या फेरीत गावातील सर्व महिला, युवकांनी मराठी भाषिकांनी सहभाग घेतला होता.
तत्पूर्वी कुद्रेमानी गावातही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत गावातील असंख्य माता भगिनी, नागरिक सहभागी झाले होते.
यानंतर बाची गावातही फेरीत मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग दिसुन आला. होता. संपूर्ण गावात हार्दिक स्वागत आणि घागर हे चिन्ह रांगोळीने रेखाटण्यात आले होते.
एकूणच या तिन्ही गावात एक भगवे वादळ निर्माण झाल्याचे दिसून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या आणि समितीच्या विजयाच्या जोरदार घोषणा देत गावातील प्रत्येक गल्लीतून फेरी काढण्यात आली.
*फेरीतील गर्दी पाहून विरोधका धडकी….*
तुरमुरीत प्रचार फेरीतील जनसागर उसळलेला पाहून इतर पक्षाच्या उमेदवाराची झोप उडाली आहे. गावातील प्रत्येक युवक, युवती, महिला आणि पुरुष मोठ्या जिद्दीने फेरीत सहभाग झाला होता. उमेदवराला विजयी करण्याबरोबर सीमाप्रश्नाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.