अपघातात दोन जण जागीच ठार तर काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर जखमी
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक आणि कार अपघातात दोन जण जागीच ठार तर मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर जखमी झाले.
पुणे बंगलोर महामार्गावर होनगा गावाजवळ हा अपघात घडला.अपघातात कार चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली एक व्यक्ती जागीच ठार झाले.कारमध्ये मागे बसलेले मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी अपघातात गंभीर जखमी झाले.स्वामीजींना उपचारासाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आय सी यु मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावातील मुप्पिनमठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी बेळगावात होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते.अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कार मधून जखमी स्वामीजींना बाहेर काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले.अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.नंतर पोलिसांनी क्रेनने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.